व्हॅलेंटाईन स्पेशल
सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. हा प्रेमाचा उत्सव जगभरात चालू आहे.कुठे गुलाब दिले जातायत तर कुठे गिफ्ट्स खरेदी करण्याचा उत्साह तर कुठे कोण कोणाला प्रपोज करताय प्रमोज नंतर उत्तराची वाट बघणे हो उत्तर आल्यावर एकत्र साजरा करणे आणि उत्तर नाही असेल तर उदासीनता सगळी गंमतच नाही का... खरं तर व्हॅलेंटाईन डे हा पाश्चात्यांचा सण म्हणून हिणवला जातो ही आपली संस्कृती नाही म्हणून नाकारली जाते तरी सुद्धा व्हॅलेंटाईन डे हा भारतात एकाद्या सणा सारखाच साजरा केला जातो..
प्रेम म्हणजे नुसतंच एकमेकांना भेटवस्तू देऊन एखादा दिवस साजरा करणे नाही तर वर्षाचे सर्व दिवस साजरे केले तरी अपुरे पडेल अशी छान संकल्पना. आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीबरोबर प्रत्येक क्षण जगणे एकमेकांनच्या आवडी निवडी समजून घेणून त्या प्रमाणे एकमेकांसाठी काही तरी मनापासून करणे अडीअडचणीच्या वेळी एकमेकांना साथ देणे म्हणजे प्रेम.
प्रेम हे कविते सारखे असते.. एखादी छानशी कविता सतत वाचल्यावर नव्याने आपण त्या कवितेच्या प्रेमात पडत असतो तसेच आपल्या प्रियकराच्या/ प्रेयकरीच्या प्रेमात रोज नव्याने पडणे.
valentine day वैगरे काही नसतं रे मनाच्या कल्पना असतात....
तू पहिल्यांदा जेव्हा माझ्या प्रेमात पडलास तसाच रोज नव्याने फक्त माझ्याच प्रेमात पडावं हेच प्रेम असतं....
तू पहिल्यांदा मला ज्या भावनेने मीठीत घेतलस त्याच भावनेने रोज एकदा तरी मीठीत घेणं म्हणजेच प्रेम असतं....
रोज सकाळचा पहिला मेसेज आणि रात्रीचा शेवटचा मेसेज मला करणं म्हणजेच प्रेम असत....
I love u या सरळ साध्या शब्दाला वळण देणं हेच प्रेम असतं....
वयाच्या साठाव्या वर्षी ही एकमेकांबद्धलची ओढ वाटणं म्हणजेच प्रेम असतं....
Comments
Post a Comment