नाती
आयुष्याच्या रंगमंचावर आपल्याला अनेक माणस भेटतात त्या प्रत्येक व्यक्ती बरोबर आपले वेगळे नाते तयार होते. काही जण काही क्षणांसाठी भेटतात तर काही आयुष्यभरासाठी भेटतात. कित्येकदा काही क्षणांसाठी भेटलेले माणसं खूप आनंद देऊन जातात पण आयुष्यभरासाठी असलेले माणसं मनच जाणत नाहीत. या धकाधकीच्या जीवनात सगळ्यात जास्त महत्वाचा भाग म्हणजे नाती. सुरवातीच्या काळात नात्यानं खूप जास्त महत्व होते. रक्ताची नाती जास्त महत्वाची आणि बाकीची नाती नाही असं काही नव्हतं. कोणाच्याच मनात एकमेकान विषयी वाईट नसायचे परंतु आता नात्यानं मध्ये दुरावा आला आहे. प्रत्येकाच्या मनात आपुलकीची भावना नसून आपण एकाद्या व्यक्तीचा कसा फायदा घेऊ शकतो याचा वीचार केला जातो. कोणीच कोणाची निस्वार्थ मदत करत नाही. नात्यानं मध्ये प्रेम जाणवत नाही. आपल्याला प्रत्येक नात्यांमधून काही ना काही शिकायला मिळते. एखादी तरी चांगली सवय लागते.
नात्यांशीवाय आपले आयुष्य अपूर्ण आहे हे समजून घ्यायला हवे. व आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याला योग्य तितके महत्त्व द्यावे.
Comments
Post a Comment