बदलता काळ



  सुरवातीच्या काळात फोन नव्हते त्या मुळे एकमेकांशी संपर्क साधता यायचा नाही. त्या वेळी पत्रा द्वारे विचारपूस केली जायची. एकाद्या व्यक्तीचे निधन झाल्या नंतर दूर राहणाऱ्या नातेवाईकांना ही घटना दोन ते तीन दिवसानंतर कळायची कारण  त्या वेळी कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग नव्हती तसेच कनेक्टिव्हिटीसाठी लागणारे उपकरण देखील जास्त प्रमाणात उपलब्ध नव्हती. या काळात प्रत्येक व्यक्तीला वाटायचे आपल्या घरात निदान एक तरी मोबाइल फोन हवा ज्याच्या मदतीने आपण आपल्या नातेवाईकांशी अडीअडचणीच्या वेळी संपर्कात राहू.
     हळू हळू परस्थिती बदल गेली आणि मोबाईल फोन येऊ लागले फरक फक्त इतकाच होता आधी कुटूंबात एक मोबाईल फोन असावा अशी अपेक्षा असायची आता मात्र कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कडे त्याचा स्वतःचा वयक्तिक असा मोबाईल फोन असतो. सुरवातीला मोबाईल फोन आले तेव्हा त्याचा वापर हा फक्त कामासाठीच केला जात होता. मात्र आता कामा व्यतिरिक्त अनेक गोष्टींसाठी मोबाईल फोनचा वापर केला जातो. मोबाईल फोनला इंटरनेटची जोड मिळाल्यापासून तर जग बदलच आहे. फेकबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हाट्सएप इत्यादी अँपद्वारे लोकं एकमेकांशी  टच मध्ये राहतात , या माध्यमांनचे अनेक फायदे होतात या पण याचे अनेक तोटे देखील आहेत.
      सुरवातीला गरज म्हणून वापरली जाणारी वस्तु आता व्यसनासारखी वापरली जाऊ लागली आहे.

Comments