O2

हल्लीच एका पेपर मध्ये एक आर्टिकल वाचले त्या आर्टिकल मध्ये आपल्या आयुष्यातील o2 बद्धल लिहायचे होते o2 म्हणजे आपल्या आयुष्यात असणार आपलं चालत बोलत ओकॅसिजन  म्हणजेच असा एखादा व्यक्ती ज्याच्या मुळे आपल्याला आपले आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते  शीवाय आपण आपलं आयुष्य त्या व्यक्तिशिवाय imagen नाही करू शकत 
         हे वाचल्या नंतर पटकन त्याच क्षणी एक व्यक्ती मनात आला..हो तो व्यक्ती तूच आहेस सुरवातीला सगळ्यांना चुकीचा वाटलेला माझा mr perfect. आपले आई बाबा आपला o2 असतातच परंतु आपल्या वयाच्या मानसिकतेला समजून घेऊन आपल्याला नेमक काय वाटय हे आपल्याला समजवणे हे कधी कधी आई बाबां नाही जमत. माझ्या o2  मुळे माझ्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली. जगा बरोबर कसे डील करायचे हे त्याच्याकडूनच शिकली, माणसं ओळखणं हे देखिल त्यानंच शिकवलं, माझ्या प्रत्येक सुखं दुःखात मला आधार देणारा, मला चूक आणि बरोबर मधला फरक समजावून सांगणारा आणि फक्त समजावून शांत न बसता ते पटवुन देणारा, कधी प्रेमाने तर कधी रागाने माझी काळजी घेणारा, मला आवडणाऱ्या गोष्टी करणारा, मला रडताना न पाहू शकणारा, मला सतत बालिश आणि बैलं बोलणारा, F.Y. पासून माझ्या सावली सारखा माझ्या बरोबर रहाणारा, माझ्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी प्रयत्न करणारा, माझ्यासाठी गाणी गाणारा, कधी कधी माझी होणारी चीड चीड सहन करणारा, बाहेरून खूप कठोर पण आतून खूप सॉफ्ट अगदी नारळाचे उदाहरण देता येईल असा, नाकाच्या शेंड्यावर राग व मनात खूप विचार घेऊन वावरणारा, कधी कधी लहान बाळा सारखा हट्ट करणारा तर कधी कधी एखाद्या मोठ्या माणसासारखा समजूतदारपणे वागणारा,  खूप आकांशी, स्वप्नाळू, जिद्दी, खूप जास्त ऍक्टिव्ह असणारा, डान्सची फक्त आवड नसून डान्सवर प्रेम करणारा, माझ्यासाठी प्रत्येक क्षणी हजारअसणारा, माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारा माझा o2 *योगेश*

Comments

Post a Comment