women's

      आज women's day आहे. आजच्या दिवशी सगळेच लोक आपल्या आयुष्यात असणाऱ्या स्त्रीयांना तुम्ही आमच्यासाठी किती महत्वाच्या आहात हे वेगवेगळ्या मार्गाने पटवून देत असत. काही बोलून व्यक्त होतात तर काही लोक गिफ्ट्स देऊन.  या दिवशी स्त्रीला खूप स्पेशल असल्याची जाणीव करून दिली जाते. स्त्री शिवाय हिरो देखील जीरो अश्या वेगवेगळ्या डायलॉगच्या पोस्ट आपल्याला फेसबुकवर तसेच इतर सोशल मीडियावर पाहायला मिळते. पण  मला एक प्रश्न पडतो हा सगळा मान, प्रेम, आपुलकी, स्त्रिया किती महत्वाच्या आहेत याचे कन्फेशन्स फक्त आजच्या दिवशीच का? वर्षाचे उरलेले तीनशे चौशष्ट दिवस हे प्रेम, आपुलकी कुठे जाते? जे पुरुष आज स्त्रिया किती महत्वाच्या आहेत हे पटवून देणारे पोस्ट शेअर करतात तेच पुरुष स्त्रियांनबद्धलचे अश्लील मॅसेज, पोस्ट शेअर करून स्त्रियांना कलंकित करतात. म्हणजे स्त्रिया या फक्त एकाच दिवसासाठी महत्वाच्या असतात का?
     आयुष्य जगण्यासाठी जसे अन्न, वस्त्र, निवारा या तीन  मूलभूत गरजांची आवशक्यता आहे त्या प्रमाणेच स्त्री ही देखील मानवी आयुष्याची एक मूलभूत गरजच आहे. स्त्रियांनशिवाय जगणे हे अशक्यच आहे.
         आपल्याला जन्म देणारी ही एक स्त्रीच असते ती म्हणजे आई , आपल्याला लहानपणी आपल्याला आई वडिलांच्या ओरड्यापासून वाचवते आणि आपली पाटर्नर ईन क्राईम असते ती म्हणजे बहीण , वयाच्या ज्या टप्यात आपल्या मनातल्या काही गोष्टी आपण आपल्या आई बाबांना किंवा बहिणीला सांगू नाही शकत त्या वेळी आपल्या भावना समजून घेते ती म्हणजे मैत्रीण , आपले घर आपले कुटूंब ती एवढ्या अनोळखी व्यक्तीसाठी सोडुन येते व त्याच्या घराला एक नवे घरपण देऊ पाहते ती म्हणजे बायको ,  घराला एक नवी उमेद देते वडिलांना आईच्या ओरड्या पासून वाचवते ती म्हणजे मुलगी, लहानपणी आई घरी नसताना गोष्टी सांगून  आपल्या बटव्यातला खाऊ देते ती म्हणजे आजी अश्या अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडू शकते ती म्हणजे फक्त स्त्री आहे.
      त्यामुळे फक्त एकच दिवस साजरा करण्यापेक्षा त्यांना रोज आदर दया आणि फक्त पुरुषांनीच स्त्रियांना आदर देऊन हा दिवस साजरा होणार नाही आहे तर स्त्रीने सुद्धा स्त्रीचा आदर केला पाहजे.

Comments